नाशिक : प्रतिनिधी
अशोका एकात्मिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयामध्ये सांस्कृतिक विरासत या विषयावर आधारित अंतरंग २०२४-२५ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विद्यार्थ्यांनी विविध राज्यांमधील सणांचे प्रतिनिधित्व केले.
पहिल्या दिवशी इंडिअन कल्चरल फ्युजन डे, इथिकल एक्सप्लोरर डे आदी विविध विद्यार्थ्यांच्या सक्रिय सहभागाने यशस्वीपणे पार पडले. सांस्कृतिक कार्यक्रमात ऐडू फ्युजन फेअरचे देखील आयोजन करण्यात आले होते. यात विद्यार्थ्यांनी विविध राज्यातील पारंपारिक खाद्यपदार्थ स्वतः तयार करून त्याचे स्टॉल लावले होते. इंडिअन कल्चरल फ्युजन डे साठी मोनाली काकडे, इथिकल एक्सप्लोरर डे साठी चेतन सुशीर आणि ऐडू फ्युजन फेअरसाठी लीना गोऱ्हे परीक्षक होत्या.
विद्यार्थ्यांनी विविध राज्यांमध्ये होणारे सण, त्यांची संस्कृती दर्शवणारे दृश्य वर्गांमध्ये तयार केले होते. तसेच सांस्कृतिक पोशाखांचे प्रदर्शन हे या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण होते.
अशोका संस्थेचे चेअरमन अशोक कटारिया, सचिव श्रीकांत शुक्ला, प्रशासक डॉ. नरेंद्र तेलरांधे व प्रभारी प्राचार्या डॉ. आशा ठोके यांचे मार्गदर्शन लाभले. सांस्कृतिक कार्यक्रमाचे नियोजन सहायक प्रा. प्रियंका मोरवाल व सहायक प्रा. हर्षदा शिरवाडकर यांनी केले. तसेच प्रा. प्रिया कापडणे, सहायक प्रा. स्मिता बोराडे व डॉ. रेखा पाटील, विद्यार्थी प्रतिनिधी ग्लोरिया मोजेस व रिशिका रखेजा, तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.
—