नाशिक : प्रतिनिधी
अश्विननगर येथील युडब्ल्यूसीईसीमध्ये क्रीडा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यात चिमुकल्यांसह मातांनी सहभाग घेतला. विद्यार्थी व त्यांच्या मातांनी स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटला. विजेत्यांना पदक, प्रमाणपत्र आणि भेटवस्तू देण्यात आले.
प्रत्येक वर्गासाठी वेगवेगळे खेळ ठेवण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी उत्साहाने यात सहभाग घेतला. क्रीडा थीमची सुंदर सजावट केली होती. मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी पार्श्वभूमीवर खेळांशी संबंधित संगीत वाजवले जात होते. सिनियर केजीच्या विद्यार्थ्यांनी धावण्याची शर्यत आणि अडथळा शर्यत, ज्युनियर केजीच्या विद्यार्थ्यांनी धावण्याची शर्यत व मणी आणि धावण्याच्या शर्यतीत भाग घेतला. यावेळी नर्सरीच्या विद्यार्थ्यांच्या मातांना आमंत्रित केले होते. नर्सरीच्या वर्गात विद्यार्थ्यांसाठी बटाट्याची शर्यत आणि बॅकपॅक शर्यत आयोजित केली होती. ज्यामध्ये आई आणि मूल दोघांनाही भाग घ्यायचा होता.
—