नाशिक : प्रतिनिधी
नाशिक तालुका शेतकी सहकारी संघाच्या तज्ज्ञ संचालकपदी म्हसरूळ सार्वजनिक वाचनालयाचे संचालक व म्हसरूळ विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे माजी सभापती प्रशांत मोराडे व भगूर येथील चंद्रकात कासार यांची, तर कार्यलक्षी संचालकपदी मखमलाबाद ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष भास्करराव पिंगळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
नाशिक तालुका शेतकी सहकारी संघ संस्थेच्या संचालक मंडळाची मासिक सभा नुकतीच सभापती शरदराव गायखे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यात ही नेमणूक झाली.
तसेच मविप्र संस्थेचे संचालक रमेश पिंगळे, माजी नगरसेवक दामोधर मानकर, पुंडलिकराव खोडे, सेवानिवृत्त पोलिस उपअधीक्षक दिनकर पिंगळे, सहाय्यक पोलिस आयुक्त प्रभाकर घाडगे, मखमलाबाद सोसायटीचे माजी सभापती मदन पिंगळे, ज्ञानेश्वर पिंगळे, व्ही. एन. नाईक संस्थेचे संचालक गोकुळ काकड, विश्वस्त नारायणराव काकड, मोतीराम पिंगळे, शंकरराव पिंगळे, जिजाई फाऊंडेशनचे संस्थापक प्रमोद पालवे, तसेच मखमलाबाद ग्रामविकास मंडळाचे संचालक मंडळ यांनीदेखील अभिनंदन केले आहे.
—