एका दिव्य गुरूला गुरूस्थान प्राप्त करण्यासाठी शरीराची आवश्यकता नसते. “योगी कथामृत” या अभिजात आध्यात्मिक पुस्तकाचे लेखक श्री श्री परमहंस योगानंद आणि “कैवल्य दर्शन (द होली सायन्स)” या सखोल विचारांचा उलगडा करणाऱ्या पुस्तकाचे लेखक श्री श्री युक्तेश्वरगिरीजी, हे आजच्या मितीसही या विधानाला पुष्टी देतात.
मार्च महिना हा त्यांच्या महत्वपूर्ण महासमाधीमुळे खास ठरला आहे. या महिन्यात ईश्वरी तेजाने प्रकाशित गुरूंनी त्यांच्या मृत्युसमयी आपल्या देहाचा जाणिवपूर्वक त्याग केला. स्वामी श्रीयुक्तेश्वर गिरींनी 9 मार्च 1936 रोजी आणि त्यांच्या जागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेले शिष्य योगानंदजी यांनी 7 मार्च 1952 रोजी महासमाधी घेतली. क्रियायोग परंपरेतील या दोन्ही गुरूंनी त्यांचे शरीर एखाद्या ओळखता येणाऱ्या जीर्ण वस्त्रासारखे सोडले आणि त्यांच्या भक्तांना एका वेळेस क्रियायोगाच्या दीर्घ श्वसनमार्गाने मोक्षाप्रत जाण्यासाठी मार्गदर्शन करीत अमर झाले.
“योगी कथामृत” मध्ये वर्णन केल्याप्रमाणे क्रियायोग हा असा एक अभ्यास आहे, ज्यामुळे रक्तातील कर्बाचे प्रमाण कमी होते, परिणामत: शरीराचा क्षय कमी होतो आणि त्यास प्रतिबंधही होतो. या अतिरिक्त प्राणवायूचे अणू पेशींना शुद्ध ऊर्जेमध्ये रुपांतरीत करतात. अशाप्रकारे 30 सेकंदाचे एक क्रियेचे श्वसन नैसर्गिक उत्क्रांतीच्या एका वर्षाच्या बरोबरीचे होते. हेच ते प्राचीन विज्ञान आहे जे कृष्णाने अर्जुनाला दिले आणि त्यानंतर ते पतंजली आणि इतर शिष्यांना माहीत झाले. आत्ताच्या युगात, महावतार बाबाजींनी ते लाहिरी महाशयांना दिले, ज्यांनी ते पुढे योगानंदजींचे गुरू श्रीयुक्तेश्वर गिरी यांना दिले.
मुकुंदा, ज्यांना नंतर योगानंदजी म्हणून ओळख मिळाली, ते 1910 मध्ये, वयाच्या 17 व्या वर्षी त्यांचे गुरू श्रीयुक्तेश्वरगिरी यांना भेटले. ज्या कठोर मार्गदर्शनामुळे आश्रमातील इतर मुलांना पळून जावे लागले, त्याच अतिशय संयमित बोलण्यामुळे त्याच्या गुरूंचे आदेश मुकुंदाच्या आत्म्यावर बिंबवले गेले.
शेवटी, त्या तरुण मुलाला त्याच्या गुरूंकडून एक गुरू बनण्याचे प्रशिक्षण मिळत होते. कारण बाबाजींनी अनेक वर्षांपूर्वी युक्तेश्वरगिरीजींकडे भाकीत केले होते की, पश्चिमेकडे क्रियायोगाचा प्रसार करण्यासाठी योगानंदजीची निवड झाली आहे.
योगानंदजी, जरी सुरुवातील अगदी पूर्वेलासुद्धा संस्था काढण्यासाठी इच्छुक नव्हते, तरीही त्यांनी आपल्या गुरूंच्या पुढे मान तुकवली. 1917 मध्ये त्यांनी योगदा सत्संग सोसायटी ऑफ इंडिया (वाय.एस.एस.)ची स्थापना केली. आणि 1920 मध्ये, ते अमेरीकेचे पूर्वभाकितानुसार बोलावणे आले. ते तरुण गुरू अशा भूमीकडे निघून गेले जेथील भाषा जशी त्यांना अपरिचित होती, तशीच त्या भूमीला योगविद्या अपरिचित होती. परंतु ईश्वरानुभूती झालेल्या गुरुच्या मार्गात संवादाचे साधन असे क्षुल्लक कारण क्वचितच येऊ शकते. त्यांचे पहिले इंग्रजीतील व्याख्यान, त्यांना परदेशी घेऊन जाणाऱ्या जहाजावर झाले. त्यानंतर मात्र अमेरिकेतील प्रत्येक शहरात तुडुंब भरलेल्या सभागृहांमध्ये व्याख्यान देण्यासाठी ईश्वराने त्यांची निवड केली. त्यातूनच 1920 मध्ये सेल्फ-रिअलाइझेशन फेलोशिप (एस.आर.एफ.)ची स्थापना झाली.
या अद्वितीय गुरूने साधू महंतांना आणि गृहस्थांना क्रियायोग शिकविला, अगदी त्यांच्या महासमाधीपर्यंत, जी सुद्धा नाट्यमयतेपेक्षा कमी नव्हती.
मृत्युच्या 20 दिवसानंतरही त्यांच्या शरीरावर विघटनाचे कोणतेही चिन्ह दिसून आले नाही. शवागृहाचे संचालक श्री हॅरी टी. रो. यांनी नोंदवले आहे की, परमहंस योगानंद यांचे शरीर “अक्षय्यत्वाच्या अभूतपूर्व अवस्थेत राहिले.” ते महान गुरू मृत्युमध्येही मानवाला दाखवून देत होते की, जसे त्यांनी आपल्या जीवनकाळात साध्य केले, तसे योग आणि ध्यानाद्वारे निसर्ग आणि काळाच्या शक्तींवर प्रभुत्व मिळवणे शक्य आहे.
योगानंदजी, जसे त्यांनी स्वत:च्या शब्दात वचन दिले होते, तसे त्यांच्या महासमाधीच्या 73 वर्षांनंतरही, आत्म-साक्षात्काराच्या गृहपाठांद्वारे त्यांच्या उत्सुक साधकांना क्रियायोग शिकवत आहेत. “जे सेल्फ-रिअलाइझेशन फेलोशिप किंवा योगदा सत्संग सोसायटी ऑफ इंडिया कडे खरोखरच अंत:करणापासून आध्यात्मिक मदत शोधत आले आहेत, त्यांना ईश्वराकडून जे पाहिजे आहे ते मिळेल. कदाचित ते मी शरीरात असताना येतील, किंवा नंतर येतील.” अधिक माहिती : yssofindia.org
लेखिका : नेहा प्रकाश