नाशिक : प्रतिनिधी
क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षणप्रसारक संस्थेच्या दिंडोरी येथील कला आणि वाणिज्य महाविद्यालयात रोटरी क्लब ॲाफ नाशिक मिडटाउनतर्फे थॅलेसेमिया जागृती व्याख्यान, तसेच पुनर्वापरात येणारे सॅनिटरी नॅपकिनचे वितरण झाले.
सेक्रेटरी डॉ. किरण बिरारी यांनी थॅलेसेमिया या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांमध्ये थॅलेसेमिया या आजारासंबंधी जनजागृती केली. यावेळी त्यांनी हिमोग्लोबिनचे मानवी शरीरातील महत्त्व समजावून सांगितले. संयोजिका प्रा. प्रतिभा चौधरी यांनी सॅनिटरी नॅपकिन व त्याचा पुनर्वापर कसा करायचा याची माहिती विद्यार्थिनींना सांगितली.
याप्रसंगी रोटरी क्लब नासिक मिडटाउनचे अध्यक्ष ॲड. अजय जाधव, माजी अध्यक्ष डी. आर. पाटील, महेश दिवटे, रेखा पहाडी, सरला सोनवणे, प्राचार्य डॉ. राजेंद्र सांगळे, उपप्राचार्य डॉ. सुनील उगले, कनिष्ठ विभागातील उपप्राचार्य प्रा. शिवाजी साबळे, आयक्यूएसी समन्वयक प्रा. वैशाली गांगुर्डे, वाणिज्य विभागातील प्रा. डॉ. तेजस्विता मुंडे, प्रा. निकिता वाटाणे व प्रा. मोनिका कुमावत उपस्थित होते.
विद्यार्थिनी मंच प्रमुख डॉ. रूपाली शिंदे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. दिलीप गांगुर्डे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. योगिता ढाकणे यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या सर्व विद्यार्थिनींना २५० सॅनिटरी नॅपकिनचे वाटप करून कार्यक्रमाचा समारोप झाला.
—
रोटरी क्लब ॲाफ नाशिक मिडटाउनतर्फे थॅलेसेमिया जागृती व्याख्यान, तसेच पुनर्वापरात येणारे सॅनिटरी नॅपकिनचे वितरण
Get real time updates directly on you device, subscribe now.