नाशिक : प्रतिनिधी
विद्यासेवा संस्था (नाशिक) संचलित प्रणित विद्यालय, पेठरोड येथील इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांना नुकताच निरोप समारंभ नुकताच झाला. प्रमुख पाहुणे म्हणून स्वामीनारायण मंदिर (दादर, मुंबई) येथील योगेश स्वामी उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
ते म्हणाले की, विद्यार्थ्यांनी नियमित अभ्यास करावा. आई – वडिल व शिक्षकांची आज्ञा पाळावी.आई व वडिलांना रोज सकाळी नमस्कार करावा.
मोबाईल – टीव्ही हे राक्षस आहेत. त्यांचा जपून वापर करावा. आईला घरकामात मदत करावी.आपल्या वाढदिवसाच्या दिवशी एक तरी झाड लावून त्याचे संगोपन करावे.आपले शिक्षक आपल्याला अभ्यासावरोबरच संस्कारक्षम बनवतात. त्यांचा आदर करणे हे आपले कर्तव्य आहे. ते रागावले तरी त्याबद्दल मनात राग धरू नये. तसेच प्रत्येक शिक्षकाने विद्यार्थ्यांमध्ये स्वामी विवेकानंद व माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम बघितले पाहिजे.
यावेळी सिक्कीम येथील पोलीस अधिकारी गंगा प्रधान व आरटीओ अधिकारी प्रधान, विद्यासेवा संस्थेचे सरचिटणीस गणेश पिंगळे, संस्थेच्या अध्यक्षा सुरेखा पिंगळे, उपाध्यक्ष प्रणित पिंगळे उपस्थित होते. दीपक पाटील यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी शिक्षक, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
—