नाशिक : प्रतिनिधी
श्रीमती पुष्पावतीबाई चॅरिटेबल ट्रस्टच्या निसर्ग विद्यानिकेतन महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव व प्रमाणपत्र वितरण सोहळा उत्साहात झाला. योग व निसर्गोपचार अभ्यासक्रमात डॉ. सुरज मगर (प्रथम), कविता गायकवाड (द्वितीय) आणि डॉ. प्रज्ञा पगार (तृतीय) यांनी यश संपादन केले. त्यांना ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच, उर्वरित सर्व विद्यार्थ्यांचा पदक व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
अभिलाषा निसर्गोपचार केंद्राच्यावतीने गुरूजनांचा गौरवही करण्यात आला. गुरूदक्षिणा प्रोजेक्ट, टी. ए. कुलकर्णी हॉल (तिसरा मजला) येथे हा समारंभ पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या स्कूल ऑफ कंटिन्युईंग एज्युकेशनचे संचालक प्रा. डॉ. जयदीप निकम यांनी भूषवले. आयएनओचे कार्यकारी अध्यक्ष 1008 महामंडलेश्वर स्वामी शिवानंद महाराज व जान्हवी मशिन्स प्रा. लि.चे व्यवस्थापकीय संचालक गोविंद झा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी मान्यवरांना विशेष उपाध्यांनी गौरविण्यात आले. यात प्रा. डॉ. प्र. द. कुलकर्णी यांना योगश्री, सुरेश पवार यांना कर्मयोगी, डॉ. तस्मिना शेख यांना योगाचार्या, अशोक पाटील यांना योगगुरू, यु. के. अहिरे यांना योगगुरू, मोहम्मद सय्यद यांना योगप्रेरणा, एन्नुदीन शेख यांना योगमित्र, साबिक शेख यांना योगप्रेरणा ही उपाधी देण्यात आली.
एक वर्षीय महाराष्ट्र राज्यशासन मान्य या कोर्सच्या निकालात 100 टक्के यश मिळाल्याचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाने विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण केले असून, त्यांच्या यशाचा गौरव करण्यात आला.
—