नाशिक : प्रतिनिधी
प्रजासत्ताक दिनानिमित्त मेरी – म्हसरूळ परिसरातील नागरिकांसाठी झालेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबीरात ५०० पेक्षा जास्त नागरिकांनी सहभाग नोंदविला. ज्येष्ठ नागरीक व महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. सामाजिक कार्यकर्ते प्रविण रमेश जाधव यांनी ग्रॅव्हिटी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलच्या सहकार्याने हे शिबीर आयोजित केले होते. गजानन महाराज मंदिर, वृंदावननगर येथे हे शिबीर झाले.

शिबिरात रक्तशर्करा, ऑक्सिजन, रक्तदाब, डोळे तपासणी, अस्थिरोग, तसेच सर्वसाधारण तपासणी, ईसीजी आदींची होमिओपॅथी डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली. शिबिरात डॉ. दत्तात्रय मुळे, डॉ. अमोल खोलमकर, डॉ. हिमांशू कुलकर्णी, डॉ. योगेश जाधव, डॉ. रोहित कुलकर्णी, डॉ. मृणाल मुळे, डॉ. विनेश उगले यांनी सेवा दिली. तसेच एक्स रे , टूडी इको, अँजिओग्राफी आणि सोनोग्राफी या चाचण्या खास सवलतीच्या दरात, तसेच महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत मोफत उपचार व शस्त्रक्रियेबाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले.
मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे प्रमुख उद्दिष्ट हे नागरिकांच्या आरोग्य विषयक समस्यांचे लवकरात लवकर निदान होणे हे होते. जेणेकरुन निदान झाल्यावर त्या समस्येवर उपचार करण्यासाठी रुग्णाला त्वरित आवश्यक ती पावले उचलता येणे शक्य होईल. स्थानिक नागरीकांचे आरोग्यमान उंचविण्याच्या उद्देशाने अशा प्रकारचे आरोग्य शिबीर सात्यताने आयोजित करण्याचा प्रयत्न करण्यात येईल असा मानस यावेळी प्रविण रमेश जाधव यांनी व्यक्त केला.

– प्रविण रमेश जाधव, सामाजिक कार्यकर्ते