नाशिक : प्रतिनिधी
शिक्षण क्षेत्रात 103 वर्षाची ऐतिहासिक परंपरा असणाऱ्या पेठे विद्यालयात 101 वा प्रथम वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाशिक एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रा. दिलीप फडके होते. प्रमुख पाहुणे म्हणून बांधकाम व्यावसायिक दीपक बागड उपस्थित होते.
यावेळी उपाध्यक्ष ॲड. जयदीप वैशंपायन, कार्यवाह राजेंद्र निकम, कार्यकारी मंडळ सदस्य व पेठे विद्यालयाच्या शालेय समितीचे अध्यक्ष देवदत्त जोशी, कार्यकारी सदस्य राजाभाऊ वर्टी, सहकार्यवाह शैलेश पाटोळे, पालक संघाचे वर्षा कराड, ज्योती कराड, कविता महाले, माजी मुख्याध्यापक कैलास पाटील, मुख्याध्यापक भास्कर कर्डिले, उपमुख्याध्यापक शरद शेळके, पर्यवेक्षक विजय मापारी उपस्थित होते.
दीपक बागड म्हणाले की, पेठे विद्यालय हे शिक्षणाची अलौकिकता जपणारे ज्ञान केंद्र आहे. शिक्षण क्षेत्रात शिक्षणाला उज्वल भविष्य देण्यासाठी या शाळेचा सिंहाचा वाटा आहे. आपल्या जीवनघडणीमध्ये शिक्षक- पालक यांची प्रमुख महत्त्वाची भूमिका असते. आपले वैभवशाली आयुष्य घडविण्यासाठी आपण शाळा व देश यांना महत्व देणे गरजेचे आहे. शिक्षणामुळे व्यक्तीची ओळख कायमस्वरूपी प्रकाशित राहते.
देवदत्त जोशी म्हणाले की, शिक्षण व क्रीडा हे दोनही पैलू विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे आहे. शिक्षण व क्रीडा यामुळेच विद्यार्थ्यांचे स्वतंत्र ओळख निर्माण होत असते, म्हणून विद्यार्थ्यांनी यशाचे शिखर गाठण्यासाठी या दोन्ही बाजू भक्कम करणे आवश्यक आहे.
—