नाशिक : प्रतिनिधी
मविप्र समाज संस्थेच्या होरायझन अकॅडेमी, मखमलाबाद येथे संविधान दिन उत्साहात साजरा झाला.
याप्रसंगी भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्याचा परिचय करून देण्यात आला. डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापिका सोनाली गायकर यांच्या हस्ते करण्यात आले. शिक्षकांनी संविधानाची माहिती सांगून डाॅ. आंबेडकर यांच्या जीवनकार्याचा आढावा घेतला. याप्रसंगी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
—