“ तुला माझे बिनशर्त प्रेम देतो” असे त्यांच्या निष्कलंक प्रेमाचे शाश्वत वचन देताना ‘मूर्तिमंत ज्ञानस्वरूप’ ज्ञानावतार स्वामी श्रीयुक्तेश्वर गिरींनी तरुण मुकुंदाचे (नंतर परमहंस योगानंद म्हणून ओळखले जाणारे, योगदा सत्संग सोसायटीचे संस्थापक, पश्चिमेकडील योगाचे जनक आणि सर्वाधिक खपाच्या ‘योगी कथामृत’ या अभिजात आध्यात्मिक पुस्तकाचे लेखक) त्यांच्या आश्रमात स्वागत केले. नियतीच्या पडद्याआड लपलेल्या नाट्याविषयी अनभिज्ञ असलेल्या योगानंदांच्या भेटीची त्यांचे स्थितप्रज्ञ गुरू दीड दशकापासून अपेक्षा करत होते आणि आतुरतेने वाट पाहत होते.
