नाशिक : प्रतिनिधी
मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या समाजदिनानिमित्त आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा मराठा हायस्कूल, नाशिक येथे झाली. याप्रसंगी व्यासपीठावर मुख्याध्यापिका कल्पना वारुंगसे, पर्यवेक्षक प्रकाश पवार, शिवाजी शिंदे व रंजना घंगाळे उपस्थित होते. त्याचबरोबर परीक्षक म्हणून प्रा. अशोक सोनवणे, डॉ. महेश वाघ (कर्मवीर काकासाहेब वाघ महाविद्यालय,पिंपळगाव बसवंत) उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी समाज दिनानिमित्त वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन संस्थेच्यावतीने करण्यात आले होते. हे जीवन सुंदर आहे, आमची माती – आमची माणसं, शिवरायांचा आठवावा साक्षेप, स्त्री जन्मा ही तुझी कहाणी, हिरो पडद्यावरचे या विषयांवर विद्यार्थ्यांनी आपले वक्तृत्व सादर केले .
कलागुणांना वाव देण्यासाठी संस्था अग्रेसर
याध्यापिका कल्पना वारुंगसे म्हणाल्या की, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी मराठा विद्याप्रसारक समाज संस्था ही नेहमीच अग्रेसर असते. ही स्पर्धा हे याचे उत्तम उदाहरण आहे. या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना त्यांनी शुभेच्छा दिल्या. उपस्थित सर्व परीक्षकांचे गुलाबपुष्प व पुस्तक देऊन स्वागत करण्यात आले.
आठ शाळांचा सहभाग
11 ऑगस्ट 2023 रोजी आयोजित या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत एकूण 8 शाळांनी आपला सहभाग नोंदविला. या स्पर्धेमध्ये मराठा हायस्कूलची विद्यार्थिनी श्रुती अमित पाटील हिने प्रथम क्रमांक मिळविला. सर्व सहभागी विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. विद्यार्थ्यांनी सदर स्पर्धेमध्ये आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदविला व आपल्या विषयाचे उत्कृष्ट पद्धतीने सादरीकरण केले.
कार्यक्रमासाठी प्रयत्नशील
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सविता जाधव यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार विद्यालयाचे पर्यवेक्षक प्रकाश पवार यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सांस्कृतिक समिती प्रमुख चैताली गीते, सांस्कृतिक समिती उपप्रमुख अर्चना गाजरे, वक्तृत्व समिती प्रमुख सुमन आरोटे व दीपमाला झाडे यांनी विशेष मेहनत घेतली.
यांनी केले अभिनंदन
तिच्या या यशाबद्दल मविप्र समाज संस्थेचे अध्यक्ष डाॅ. सुनील ढिकले, उपाध्यक्ष विश्वासराव मोरे, सरचिटणीस ॲड. डाॅ. नितीन (भाऊ) ठाकरे, चिटणीस दिलीप दळवी, सभापती बाळासाहेब क्षिरसागर, उपसभापती देवराम मोगल, नाशिक शहर तालुका संचालक ॲड. लक्ष्मणराव लांडगे, नाशिक ग्रामीणचे तालुका संचालक रमेश (आबा) पिंगळे व सर्व संचालक मंडळ, मविप्र समाज संस्थेचे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी प्रा. डाॅ. भास्करराव ढोके, शिक्षणाधिकारी प्रा. डाॅ. अशोकराव पिंगळे, प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी डी. डी. जाधव, शालेय समितीचे अध्यक्ष व सर्व सदस्य, पालक – शिक्षक संघाचे अध्यक्ष व सर्व सदस्य, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.
—