नाशिक : प्रतिनिधी
जागतिक योग दिनानिमित्त येथील पुष्पावतीबाई चॅरिटेबल ट्रस्टतंर्गत अभिलाषा निसर्गोपचार केंद्रातर्फे विविध उपक्रमांत सहभाग घेण्यात आला. त्याबद्दल त्यांचा आमदार देवयानी फरांदे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
याप्रसंगी ट्रस्टच्या अध्यक्ष तस्मिना शेख, सचिव सुनिता पाटील, रणजित पाटील, योगगुरू नंदकुमार देसाई आदी उपस्थित होते.अनंत कान्हेरे मैदान (गोल्फ क्लब) येथे हा कार्यक्रम झाला.
पुष्पावतीबाई चॅरिटेबल ट्रस्टतंर्गत अभिलाषा निसर्गोपचार केंद्रातर्फे योग व निसर्गोपचाराबाबत वर्षभर विविध उपक्रम राबविले जातात. यातंर्गत आरोग्यदायी जीवनशैली व नैसर्गिक उपचार पद्धतींबाबत मार्गदर्शन केले जाते.
—