नाशिक : प्रतिनिधी
येथील श्री भद्रकाली देवी मंदिर (शनि मंदिर) न्यासातर्फे नृत्य भक्ती रंग हा कार्यक्रम शुक्रवारी (दि.५) सायंकाळी सात ते ८.३० वाजेदरम्यान होणार आहे. नृत्याली भरतनाट्यम संस्थेमार्फत हा कार्यक्रम होणार आहे. भरतनाट्यम नृत्य गुरू सोनाली करंदीकर व त्यांच्या विद्यार्थीनी या नृत्याची प्रस्तुती करणार आहेत. आद्य ग्रामदैवत व शक्तिपीठ (चीबुक स्थान) श्री भद्रकाली देवी मंदिर, नाशिक येथे हा उपक्रम होईल.
—