नाशिक : प्रतिनिधी
चेतनानगर, राणेनगर येथे येथील पूर्णब्रह्म श्रीराम मंदिरात दरवर्षीप्रमाणेच यंदाही श्रीराम जन्मोत्सव साजरा होत आहे. यातंर्गत गुरूवारी (दि.30) नृत्याली भरतनाट्यम अकादमीतर्फे विशेष नृत्यसेवा या मंदिरात दिली जाणार आहे.
सकाळी 11.30 ला रामायणावर आधारित नृत्याविष्कार होणार आहे. हा कार्यक्रम गुरू सोनाली करंदीकर आणि त्यांच्या शिष्या खुशी रोजेकर, पुर्वा भानोसे, ऐश्वर्या अफजलपूरकर, ओजस्वी अहिरे, समृध्दी जाधव, तनिषा पोरजे सादर करणार आहेत. भरतनाट्यम नृत्याच्या माध्यमातून संपूर्ण रामायण हे या मंदिरामध्ये सादर होणार आहे.
गुढीपाडवा ते रामनवमीत मंदिराच्यावतीने व्याख्यानमाला भज गोविंद या विषयावर झाली. उपासनी गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली आठ दिवस हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.
—