नाशिक : प्रतिनिधी
डहाणू (जि. पालघर) येथे पार पडलेल्या 22 व्या राज्यस्तरीय सबज्युनियर व ज्युनियर (मुले) रस्सीखेच स्पर्धेत नाशिकच्या दोन्ही संघांनी यश मिळवले.
या स्पर्धेत सबज्युनियर गटात पालघर संघाला पराभूत करत नाशिकच्या संघाने तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. ज्युनिअर मुलांच्या संघाने द्वितीय क्रमांक मिळविला. अंतिम सामन्यात कोल्हापूर संघाकडून पराभव पत्करावा लागला. संघ व्यवस्थापक म्हणून दादासाहेब देशमुख, प्रशिक्षक म्हणून पवन खोडे यांनी जबाबदारी पार पाडली.
जिल्हा सचिव संजय पाटील, अध्यक्ष ज्ञानेश्वर टर्ले, स्वप्नील कर्पे, सुनील दवंगे, शिवशक्ती क्रीडा मंडळाचे रंगनाथ शिंदे, सुरेश शिंदे, सचिन मते, मेघनाथ माळोदे, अतुल पाटील, युवराज शेलार, अभिजित देशमुख, सुरेखा देवरे, प्रशांत गवळी यांनी विजयी संघाला शुभेच्छा दिल्या.