प्रिय वाचकहो, ध्यान हा बोलण्याचा, वाचण्याचा ऐकण्याचा, पाहण्याचा विषय नसून कृती न करण्याचा म्हणजेच काहीही न करण्याचा विषय आहे.
ध्यान अर्थ – ध्यानाकडे गंभीरपणे पाहू नये, पण गांभीर्यपूर्वक नाही, असे उद् गार ओशो यांचे आहेत.
(Sincere, but not Serious) तर संत गोरखनाथ
सांगतात, ” हसीबा खेलिबा धरिबा ध्यान’ म्हणजेच हसत-खेळत ध्यान करावे.
पतंजल योगमुनींनी योगसूत्रे सांगताना विभूतिपादातील द्वितीय सूत्रात ते स्पष्ट करतात, “तत्र प्रत्ययैकतानता ध्यानम्” म्हणजे त्यामध्ये अनुभव हा समरसतेने सातत्य ठेवले तर ते ध्यान होते. अर्थात् समरसतेचे सातत्य टिकवून ठेवले म्हणजे ध्यान.
ध्यान स्वरुप – भारतीय शब्द `ध्यान’ ही भावना अभिव्यक्त करण्यासाठी इंग्रजीतले दोन शब्दांचा उपयोग सातत्याने केला जातो. मेडिटेशन आणि कन्टेम्प्लेशन (Meditation & contemplation). अर्थात् जेव्हा मनुष्य आपल्या मनाला एका विषयाकडे एका विशिष्ट विचारधारेशी एकाग्र करतो तेव्हा वास्तविक ते असते मेडिटेशन आणि जेव्हा मन एकाग्र झाल्यावर
त्या विषयासंबंधीचे जे ज्ञान होते त्याला ‘कन्टेम्प्लेशन” असे समजले जाते.
ध्यान पद्धति : – वेगवेगळ्या आध्यात्मिक महापुरुषांनी आपल्या साधनेच्या अनुभूतिच्या प्रचितीनूरूप ध्यानाच्या विविध पद्धती विकसित केल्या आहेत.
उदा :- कोणी शब्द, प्रतिमा, प्रतिके, चित्र, एखादा विचार, अग्नि ज्योत, चंद्र, सूर्य, तारे याप्रमाणे प्रकृति धर्मानुसार जे अवलंबण्यास योग्य त्यानुसार त्या त्या
पद्धतींचा वापर करून ध्यान साधता येते. (गरुड ध्यान, संख्या ध्वनि, शरीर निरिक्षण तटस्थ, आरामा, मैत्री, दिशा, स्वउपस्थित, डोळे बंद वा उघडे ठेऊन याप्रमाणे ध्यान पद्धति वापरल्या जातात.
ध्यानाचे विषय – जे काही आपल्या स्वभाव वैशिष्ट्यानुसार आणि उच्चतम महत्त्वाकांक्षेनुसार जुळते वा जुळविले जाते आपणाकडून तोच प्रत्येकाचा ध्यानाचा विषय होत जातो. असे असले तरी आध्यात्मिक
प्रज्ञावंतांनी सर्वात ध्यानाचा उत्तम विषय म्हणून ब्रह्म आणि ज्या भावनेवर मन एकाग्र होईल तो ईश्वरीय विषय ध्यानासाठी योग्य असतो. यासाठी ईशोपनिषदच्या पृष्ठ संख्या ३८ वर ब्रह्माचे दर्शन यात श्री. अरविंद घोष यांनी आपल्या “ध्यान और एकाग्रता” या ग्रंथातून हे स्पष्टपणे मांडलेले आहे. विश्वव्यापी, व्यष्टिगत ब्रह्म, परमेश्वर, शुद्ध आणि पवित्र असा अंतर्यामी सदैव वास करणारा परमात्मा हाच समग्र ज्ञानाचा व ध्यानाचा विजय होऊ शकतो. (क्रमश:)
– पुरूषोत्तम सावंत
ज्येष्ठ्य पत्रकार व योगशास्त्राचे अभ्यासक
नाशिक
—