नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळीच अचानकपणे देशवासियांशी संवाद साधला. देशातील तिन्ही नवे कृषी कायदे मागे घेण्याची मोठी घोषणा त्यांनी केली आहे.
मोदी म्हणाले की, तिन्ही कृषी कायदे करण्यामागे मोठा उद्देश होता. मात्र, हे कायदे संमत केल्यानंतर त्याच्या अंमलबजावणी आणि फायद्यांबाबत जनजागृतीत आम्ही कमी पडलो. काही शेतकऱ्यांना आम्ही ते समजावू शकलो नाही. त्यामुळे आम्ही ते तिन्ही कृषी कायदे मागे घेत आहोत. शेतकऱ्यांच्या समस्या आम्ही जाणतो. मी त्या जवळून पाहिल्या आहेत. शेतकरी हितासाठी आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यात १ लाख ६२ हजार कोटी रुपये जमा केले आहेत. याद्वारे अल्पभूधारक शेतकऱ्यांना मोठी मदत झाल्याचे मोदी म्हणाले. तसेच, मोदी सरकारने आजवर शेतकऱ्यांसाठी नेमके काय प्रयत्न केले, कोणत्या योजना आणल्या, त्याचा कसा फायदा होत आहे, कृषी अर्थसंकल्पात किती तरतूद केली आहे यासंदर्भातील सर्व माहिती मोदींनी यावेळी दिली.
—