जलोदर
जलोदरला संस्कृत भाषेत शोध तसेच इंग्रजीमध्ये Dropsy म्हणतात. पोटात पाणी साचून राहणे. पिलेले पाणी सुद्धा न पचणे यालाच जलोदर म्हणतात.
लक्षणे
अशक्तपणा येणे, चक्कर येणे, उत्साह न राहणे, शरीर व मनाने कमजोर किंवा थकणे, काहीही कार्य करण्याची इच्छा न राहणे. या विकारात शौच्य, मुत्र व घाम न येण्यामुळे शरीरात मल साठत जाऊन शरीरात विषारी पदार्थ जमा होतात. पोटात जास्तीत जास्त पाणी साठल्याने पोट फुलते. चेहरा, पाय, हात हे सुजतात. ताप येणे अशी लक्षणे दिसतात.
कारण
या विकाराचे मुळ कारण म्हणजे अपचन या विकारात यकृत,किडनी(मूत्रपिंड) तसेच हृदय कमजोर व वारंवार अपचनाचा त्रास झाल्याने जलोदर हा विकार जडतो. या विकाराचा मुख्य परिणाम म्हणजे शुद्ध रक्त निर्मित्ती थांबते. या विकारात शरीरातील पूर्वीचे तयार झालेले रक्त सुद्धा पघळून त्याचे पाण्यात रुपांतर होते व अशक्तपणा येतो.
योगोपचार
आसन- उष्ट्रासन, भुजंगासन, सर्पासन, कटी चक्रासन, ताडासन, त्रिकोणासन, वक्रासन, अर्ध मत्सेन्द्रासन, शलभासन.
प्राणायाम- नाडीशोधन, उज्जायी,कपालभाती.
बंध – उड्डीयान
निसर्गोपचार- हा विकार योग व निसर्गोपचाराने बरा होऊ शकतो. जलोदर या विकारात प्रथम पोट व लघवी साफ करणारे भोजन आहार, रसाहार दिला पाहिजे. त्यामुळे शरीरातील विजातीय घटक निघून जातात व पचनशक्ती हळूहळू सुधारते. रोग्याला सुरवातीस भूक लागल्यानंतर दहीपाणी, मख्खन, दुध, ताजे ताक किंवा मठ्ठा, रसदार फळांचा रस, सकाळी भिजवलेले काळे मनुके, रात्री झोपण्यापूर्वी भिजवलेले शेंगदाणे,आहारात मोड आलेली मटकी, ड्रायफ़्रुटसमध्ये आवळा कॅन्डी दिवसातून तीन वेळेस, आठवड्यातून एक दिवस उपवास,पोटाची हलकी मसाज, माती पट्टी, एनिमा, थंड्पट्टी
वर्ज- मसालेदार, आंबट, तिखट, अति गोड पदार्थ, मैदायुक्त पदार्थ, बिस्किटे, केक, वडापाव, टोस्ट, खारी, रवा पदार्थ इ.
– प्रा.डॉ.राजेंद्र वामन
योग विभाग प्रमुख,
संगमनेर महाविद्यालय,संगमनेर
ई-मेल:rajendrawaman@rediffmail.com
मोबाईल नंबर:९८२२४५०७६८