सामान्य आजार आणि योग व निसर्गोपचार : जीर्ण वृद्ददान्त्र (मोठे आतडे ) Chronic Colits

0

जीर्ण वृद्ददान्त्र (मोठे आतडे ) Chronic Colits

हा मोठ्या आतड्याचा रोग आहे. यामध्ये मोठ्या आतड्यास सूज येते. काही रोग्यांच्या मोठ्या आतड्यास आतून जखमा देखील होतात. त्यामुळे शौच्येतून रक्त येते. जखम झाल्याने आजार जीर्ण व गंभीर होतो. मोठे आतडे हे लहान आतड्यापासून सुरु होते व मलाशयाजवळ येऊन संपते. मोठ्या आतड्याचे प्रमुख तीन भाग पडतात.

१) असेंडिंग कोलन २)  ट्रान्सव्हर्स कोलन  ३)  डीसेन्डींग कोलन

             मोठ्या आतड्यात प्रामुख्याने लहान आतड्यातून आलेल्या अन्नघटकातून पाण्याचे शोषण करणे व टाकाऊ अवशेष गुदाशयाकडे पाठविणे तसेच अन्नपचनानंतर राहिलेल्या चोथ्यावर म्युकसचा स्रावाचे मुलायम आवरण तयार करणे व ब (B) जीवनसत्वाची निर्मिती करणे.

लक्षणे
वारंवार पोट साफ न होणे, शौचेस सुरवातीस अति कडक येणे, नंतर शौच्य अति चिकट होणे, शौच्येतून काळ्या व लाल रंगाचे रक्त बाहेर येणे व आग होणे, नंतर जुलाब झाल्यासारखे वाटणे, कधी पातळ तर कधी अधिक कडक शौच होणे, पोट दुखणे, अशक्तपणा येणे, डोके दुखणे, रक्तदाब वाढणे इ.

कारण
दीर्घकालीन बद्धकोष्ठता यामुळे आतड्यास सूज येते. रक्तश्राव होतो, पाणी कमी पिणे, अन्न जास्त न चावता निव्वळ गिळणे. व्यायामाचा अभाव, परिश्रमाचा अभाव, सारखे बैठी कामे, शौचेस आवेग आलेनंतर प्रदीर्घकाळ रोकून ठेवणे इ. भोजनानंतर लगेचच झोपणे. पित्तप्रकोप जास्त झाल्यानेही अन्नपचन व्यवस्थित होत नाही.

योगोपचार

1.       सूर्यनमस्कार
2.       आसन- पवनमुक्तासन, वज्रासन, सुप्त वज्रासन, पश्चिमोत्तानासन, नौकासन, सर्वांगासन, हलासन, भुजंगासन, सर्पासन
3.       प्राणायाम- नाडीशोधन, भस्त्रिका, भ्रामरी, सूर्यभेदन.
4.       क्रिया- कपालभाती, वमन, शंख प्रक्षालन
5.       प्रणव ॐ कार साधना 

निसर्गोपचार निसर्गोपचारात खालील उपचार करणे आवश्यक आहे.

1.       लिंबाचे पाणी एनिमासाठी वापरावे.
2.       हिरव्या पालेभाज्या किंवा फळांचा रस घेणे.
3.       मठ्ठाकल्प किंवा ताक दररोज घेणे.
4.       तांब्याच्या पात्रात पाणी पिणे.
5.       टब बाथ घेणे.
6.       बेंबी (नाभी) ची मसाज करणे.

वर्ज- मैद्याचे पदार्थ, बिस्कीट, अति गरम, अति थंड व शिळे अन्न, जाडेभसडे उदा. चणे, डाळीचे पदार्थ या विकारात घेऊ नये. मांस, मटण, मच्छी घेऊ नये.

– प्रा. डॉ. राजेंद्र वामन
योग विभाग प्रमुख
संगमनेर महाविद्यालय,संगमनेर
ई-मेल : rajendrawaman@rediffmail.com
मोबाईल नंबर : ९८२२४५०७६८

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.