नाशिक :
येथील महर्षी पतंजली योगसंस्कार निकेतन आणि योग, आयुर्वेद व निसर्गोपचार केंद्रातर्फे आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून 11 जूनपासून शहरात विविध ठिकाणी योगवर्गांचे मोफत आयोजन करणार आहे. याबाबत नियोजनासाठी नुकतीच बैठक झाली. अध्यक्षस्थानी योगशास्त्राचे ज्येष्ठ्य अभ्यासक प्रा. राज सिन्नरकर होते.
याप्रसंगी प्रा. तुषार विसपुते, प्राचार्य जगदीश मोहुर्ले, प्रा.चैतन्य कुलकर्णी, प्रा.गणेश लोहार,प्रा. संदेश गिते, प्रा. प्रिती चांदोरकर, प्रा. सविता पोरजे, प्रा.कल्पना पवार, प्रा. ममता बुरूड, प्रा. अंजली वारघडे उपस्थित होते.
या उपक्रमात शहरातील योगशिक्षक आपापल्या परिसरात हे योग वर्ग घेणार आहेत. त्यात विविध आसन व प्राणायामाबरोबरच योगशास्त्राची सैद्धांतिक माहिती देण्यात येणार आहे. यावेळी केंद्र सरकार अंतर्गत आयुष मंत्रालयातर्फे आंतरराष्ट्रीय योग दिनासाठी
जारी केलेला योगा प्रोटोकॉल शिकविण्यात येणार आहे.

21 जूनला भव्य कार्यक्रमाने या योगविषयक उपक्रमाचा समारोप महापौर सतीश नाना कुलकर्णी, सतीश बापू सोनवणे, शाम बडोदे, दिपाली कुलकर्णी, सचिन कुलकर्णी यांच्या उपस्थितीत होणार आहे.१९ जून रोजी हॅपी योगा स्ट्रीटचे आयोजन शासन परवानगीने आयोजित होणार आहे.
—
