नाशिक : प्रतिनिधी
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठांतर्गत आयोजित केलेल्या विभागीय योगासन आणि वक्तृत्व स्पर्धेचे निकाल नुकतेच घोषित करण्यात आले. त्यामध्ये धम्मगिरी योग महाविद्यालयाच्या संजय मुरलीधर कुऱ्हे यांची अंतिम स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. २७ व २८ मे रोजी पुरुष आणि महिला अशा दोन गटांत ऑनलाइन पद्धतीने स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. योगासन स्पर्धेत ५० हून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता, तर वक्तृत्व स्पर्धेत २५ हून अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. योगासन स्पर्धेत महिला गटात जयश्री पाटील व सुमंगल कोन्नूर यांनी, तर पुरुष गटात ओमकार चव्हाण व संजय कुम्हे यांनी अनुक्रमे प्रथम आणि द्वतिय क्रमांक मिळविला. सर्व यशस्वी विद्यार्थी आता अंतिम स्पर्धेला सामोरे जाणार आहेत. दरम्यान, संजय कुऱ्हे हे मायको एम्प्लॉइज फोरमचे सचिव आहेत. त्यांच्या यशाबद्दल धम्मगिरी योग महाविद्यालयाचे डॉ. विशाल जाधव, राजेंद्र काळे व इतर शिक्षकवृंदानेअभिनंदन केले.
—
