अजीर्ण
अजीर्ण म्हणजे अपचन किंवा अन्नपाचन न होणे. या विकारास मंदाग्नी तसेच अग्नीमान्घ म्हणतात. जठराग्नी मंद होणे, भूक न लागणे व खाल्लेले अन्न व वेळेत पचन न होणे.
लक्षणे
भोजन व्यवस्थित पचन न झाल्याने आंबट, तिखट, करपट, किंवा दुर्गंधीयुक्त असे ढेकर येणे. घशात, छातीत जळजळ होणे, छातीवर दाब येणे, चमका निघणे, अस्वस्थ वाटणे, तोंडाला खारट किंवा बेचव असे पाणी येणे, हृदयाचे ठोके वाढणे, भीती वाटणे, डोके दुखणे, पोट फुलणे इ.
कारण
अवेळी व भुकेपेक्षा किंवा क्षमतेपेक्षा अधिक अन्नग्रहण करणे. अन्न पुरेसे न चावता गिळणे, पाणी कमी पिणे, भोजनानंतर लगेच झोपणे, व्यायामाचा, योगाचा अभाव यामुळे अजीर्ण हा विकार जडतो.
योगोपचार
1. सूर्यनमस्कार
2. आसन- ताडासन, चक्रासन, पादहस्तासन, त्रिकोणासन, उष्ट्रासन, वक्रासन, अर्धमच्छेंद्रासन, उष्ट्रासन, भुजंगासन, शलभासन, धनुरासन, हलासन, सर्वांगासन, वज्रासन, पवनमुक्तासन, नौकासन.
3. प्राणायाम- नाडीशोधन, भस्त्रिका, भ्रामरी, सूर्यभेदन.
4. क्रिया- कपालभाती, वमन, दंड, वस्त्र.
5. बंध- जालंधर, मूल, उड्डीयान, अग्निसार
6. प्रणव ॐ कार साधना

निसर्गोपचार– निसर्गोपचारात खालील उपचार करणे आवश्यक आहे.
1. लंघन व उपवास. तीन दिवस निव्वळ लिंबू-पाणी घेऊन रहाणे.
2. रसाहार – गाजर, संत्री, टोमॅटो, अननस रस घेणे.
3. एनिमा किंवा शंख प्रक्षालन करणे, वमन करणे.
4. पाच दिवस अल्प आहारावर थांबणे.
5. आठवड्यात एकदा एप्सम सॉल्ट बाथ घेणे.
6. पोटावर गरम पट्टी दोन वेळेस ठेवणे, पोटाची घड्याळाच्या काट्याच्या दिशेने मसाज करणे.
7. बाष्प स्नान घेणे. कटिस्नान स्नान घेणे.
वर्ज- अति तेलकट मसालेदार, तुपट, तसेच मांसाहार, दुधाचे पदार्थ (फक्त ताक वगळता )इतर सर्व वर्ज, जेवणानंतर लगेचच झोपू नये.

– प्रा. डॉ.राजेंद्र वामन
योग विभाग प्रमुख
संगमनेर महाविद्यालय,संगमनेर
ई-मेल:rajendrawaman@rediffmail.com
मोबाईल नंबर : ९८२२४५०७६८