शैक्षणिक धोरण 2020 : एकात्मिक बी.ए.बी.एड. व बी.एस्सी.बी.एड. यावर एक प्रकाशझोत

0

महाराष्ट्र राज्य मंडळाची बारावीची परीक्षा नुकतीच संपली आहे आणि बारावी नंतर पुढे काय…? असा प्रश्न पालक व विद्यार्थ्यांसमोर उभा राहतो. करिअरच्या दिशा ठरवताना पालक व विद्यार्थ्यांनी शैक्षणिक धोरण 2020 च्या शिफारशींचा विचार करून पुढील निर्णय घ्यावा. असा निर्णय घेणे विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दृष्टीने हितावह आहे. शैक्षणिक धोरण 2020 ने उच्च शिक्षणामध्ये एकात्मिक अभ्यासक्रमावर अधिक भर टाकला आहे. विद्यार्थी एकाच वेळी विविध शाखांचा अभ्यासक्रम निवडू शकणार आहे. शिक्षण व प्रशिक्षण एकाच वेळी घेता येणार आहे. वेळेचा अपव्यय टाळून स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे विविध मार्ग खुले होणार आहेत. अशाच बी.ए.बी.एड. व बी.एस्सी.बी.एड. एकात्मिक अभ्यासक्रमावर प्रकाशझोत टाकणारा हा लेख आहे.
आजचे पालक व विद्यार्थी परंपरागत शिक्षणाकडून अद्यावत शिक्षणाकडे सरसावत आहे आणि ती काळाची गरजही आहे. एकीकडे वैयक्तिक कारणास्तव जे शिक्षण पूर्ण करू शकले नाही ते दुरस्थ शिक्षणाचा मार्ग निवडतात तर दुसरीकडे प्रतिभावंत विद्यार्थी कमीत कमी वेळात जास्त अभ्यासक्रम कसे पूर्ण करू शकतील, असा मार्ग शोधतात. काळाची गरज ओळखून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने असाच अद्यावत अभ्यासक्रम पूर्वीपासून सुरू केला आहे. एकात्मिक बी.ए.बी.एड. व बी.एस्सी.बी.एड. हा अभ्यासक्रम शिक्षण व प्रशिक्षण एकाच वेळी पूर्ण करतो.
विद्यार्थी सुसंस्कारित व संस्कृतीचे जतन करून पुढील पिढीला त्याचे संक्रमण करणारा असला पाहिजे अशा प्रकारचा उत्कृष्ट विद्यार्थी उत्तम प्रशिक्षकच घडवू शकतो. शिक्षक विद्यार्थ्यांचा आदर्श असतो म्हणून शिक्षक अद्यावत असावा तर त्यासाठी शिक्षक प्रशिक्षण हे परंपरागत असून चालणार नाही तर ते अद्यावत असायला पाहिजे. अद्यावत शिक्षक निर्माण करणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे चार वर्षाच्या निरंतर प्रशिक्षणाने असा उत्तम शिक्षक तयार होतो. शिक्षक पेशासाठी आवश्यक सर्व कौशल्य व्यवस्थितपणे आत्मसात करतो. त्याचे त्याच्या विषयावर प्रभुत्व मिळते आणि आत्मविश्वास असणारा शिक्षक एकात्मिक अभ्यासक्रमातून तयार होतो.

बी.ए.बी.एड. या अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यासाठी किमान शैक्षणिक पात्रता बारावी उत्तीर्ण असावी या अभ्यासक्रमासाठी 12 वी कला व विज्ञान शाखेतील विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतो.  हा अभ्यासक्रम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने संरचीत केलेला आहे. ज्यामध्ये बी.ए. आणि बी.एड. या दोन्ही अभ्यासक्रमांचे एकत्रीकरण केले आहे. या अभ्यासक्रमाचा कालावधी चार वर्षांचा आहे. हे दोन्ही अभ्यासक्रम स्वतंत्ररीत्या पूर्ण करायचे असेल तर पाच वर्ष कालावधी लागतो परंतु एकात्मिक अभ्यासक्रम हा चार वर्षातच पूर्ण होतो तसेच विद्यार्थी आपल्या आवडीच्या विषयात विशेषीकरण करू शकतो.
बी.एस्सी.बी.एड. या अभ्यासक्रमासाठी बारावी विज्ञान शाखेतील विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात. या अभ्यासक्रमात बी.एस्सी. आणि बी.एड. या दोन्ही अभ्यासक्रमांचे एकत्रीकरण केले आहे. या अभ्यासक्रमात विद्यार्थी आपल्या आवडीनुसार फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, झूलॉजी, बॉटनी व मॅथमॅटिक्स विषयात विशेषीकरण करू शकतात. दोन्ही अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी पुढे मास्टर डिग्री करू शकतात.
हा अभ्यासक्रम नाशिकमध्ये फक्त अशोका शिक्षणशास्त्र महाविद्यालयात राबवला जातो. या अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, महाराष्ट्र राज्य यांनी प्रवेश पात्रता परीक्षा(CET) अनिवार्य केली आहे. प्रवेश पात्रता परीक्षा(CET) देऊन उत्तीर्ण झालेले विद्यार्थी बी.ए.बी.एड. व बी.एस्सी.बी.एड. अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ शकतात. प्रवेश पात्रता परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी विद्यार्थी या https:babscbed2022.mahacet.org/StaticPages/HomePage संकेतस्थळावर जाऊन फॉर्म भरू शकतात. अशोका शिक्षणशास्त्र महाविद्यालयाने बी.ए.बी.एड. व बी.एस्सी.बी.एड. अभ्यासक्रमाला प्रवेश पात्रता परीक्षेचे (CET) फॉर्म निशुल्क भरून देण्याची सुविधा विद्यार्थी व पालकांसाठी उपलब्ध करून दिली आहे. अधिक माहितीसाठी विद्यार्थी व पालक ९३५९२९९१२२ भ्रमणध्वनीवर प्रा. स्मिता बोराडे यांच्याशी संपर्क साधू शकतात.

– प्रा. स्मिता अर्जुन बोराडे,
सहाय्यक प्राध्यापक, एकात्मिक बी.ए.बी.एड.
अशोका शिक्षणशास्र महाविद्यालय, नाशिक

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.