म्हसरूळ : प्रतिनिधी
पंचवटी मेडिकल असोसिएशनतर्फे डाॅक्टर्ससाठी पीएमए डिस्ट्रीक्ट क्रिकेट स्पर्धेचे आयोजन 26 आणि 27 मार्चला केल्याची माहिती, असोसिएशनचे अध्यक्ष डाॅ. सचिन देवरे यांनी दिली.
गोल्फ क्लब मैदानावर ही स्पर्धा होईल. 26 मार्चला सकाळी 10 वाजता स्पर्धेचे उद्घाटन होईल. नाशिक जिल्ह्यातील सर्व मेडिकल असोसिएशनच्या सभासदांनी या सोहळ्याला उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
—