नाशिक : प्रतिनिधी म्हसरूळ येथील डाॅ. नीलेश कुंभारे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या डाॅक्टर्स सेल, महाराष्ट्रच्या आयुर्वेद समन्वयकपदी निवड झाली आहे. ते यापूर्वी पंचवटी मेडिकल असोसिएशनचे माजी संस्थापक अध्यक्ष होते. तसेच डाॅक्टर्स सेलच्या नाशिक जिल्हा शाखेचे ते माजी अध्यक्षही होते. ते सध्या अशोक नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन व लाडशाखीय वाणी डाॅक्टर्सची प्रबोधन या संघटनेचे अध्यक्ष आहेत. या निवडीबद्दल त्यांच्यावर विविध क्षेत्रांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

डाॅ. कुंभारे सामाजिक क्षेत्रात अग्रभागी आहेत. पेठरोडवरील तवली फाटा व हिरावाडी येथे त्यांनी वृक्षारोपण प्रकल्प साकारले आहेत. शहीद व पूरग्रस्तांसाठी मोठ्या प्रमाणात व नियमीत निधी संकलन केले आहे. त्याप्रमाणे क्रीडा स्पर्धा, शैक्षणिक सत्रे, आरोग्य शिबिरांसह अनेक उपक्रम आयोजित केले आहेत.
—