नाशिक : प्रतिनिधी
राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांबाबत सहानुभूतीपूर्वक विचार करुन सकारात्मक निर्णय घ्यावा, असे आवाहन संभाजी ब्रिगेडचे जिल्हाप्रमुख रविंद्र दातीर व महानगरप्रमुख हार्दिक निगळ यांनी केले आहे.
संभाजी ब्रिगेडतर्फे पंचवटी डेपो येथील एसटी कर्मचाऱ्यांना पाठिंब्याचे पत्र देण्यात आले आहे. याप्रसंगी त्यांनी हे आवाहन केले.
यावेळी दातीर, निगळ यांच्यासह जिल्हा संघटक प्रशांत सोनवणे, प्रवीण दातीर, संदीप आहेर, शुभम दाणी, विशाल सोनवणे, साहील उनवने, प्रसाद गोसावी, इशान बागुल, सिद्धांत तिसगे, साहील गांगुर्डे, आदीत्य सांगळे, कृष्णा मुसळे, गौरव चव्हाण आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
– रविंद्र दातीर व हार्दिक निगळ